संजना सावंतांची जनसेवा पाहुन सेना भांबावून गेली आहे;महिला-बाल कल्याण सभापती सौ गांवकर यांचा नागेंद्र परबांवर हल्लाबोल
*💫ओरोस दि.०४-:* जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी कुठेही प्रेस घेऊन पत्रकारांना उपलब्ध करून दिलेल्या लसीचे राजकारण केले नाही. तुम्हाला ते जमले नाही ते महिला अध्यक्ष म्हणून सावंत करत आहेत व त्या कुठेही कमी पडणार नाही. जनसेवेचा त्यांच्या कामाचा धडाका पाहून शिवसेना भांबावून गेली आहे. त्यामुळेच नागेंद्र परब हेदेखील पुंगी वाजवल्याप्रमाणे डोलत आहेत, असा टोला महिला व बाल कल्याण सभापतीं शर्वाणी गावकर यांनी लगावला. गावकर म्हणाल्या, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संजना सावंत यांनी पदभार हाती घेतल्यापासून जनतेवर आलेले वादळ संकट असो किंवा कोरोना महामारी यात पायात भिंगरी घातल्याप्रमाणे अहोरात्र काम करीत आहेत. खरेतर कोरोना महामारीत पालकमंत्री उदय सामंत यांनी योग्य नियोजन करून महामारी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. पण तसे झाले नाही परिणामी जिल्ह्यात रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यात आम्ही राजकारण करू इच्छित नाही. परंतु सेनेचे गटनेते नागेंद्र परब यांनी देखील नको तिथे राजकारण करू नये. जिल्हा परिषद करत असलेल्या लोकाभिमुख कारभाराचा आदर्श पालकमंत्री यांनी घेऊन नाम. सामंत यांना काम करायला सांगावे. विषय राहिला फुशारक्या मारण्याचा तर त्याची गरज सावंत यांना अजिबातच नाही. पत्रकार यांना प्राधान्यक्रमाने लस जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या पुढाकाराने आणि आदेशाने दिली. या निर्णयाचे स्वागत आणि कौतुक सर्वस्तरातून झालं. जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी कुठेही प्रेस घेऊन पत्रकार यांना उपलब्ध करून दिलेल्या लसीचे राजकारण केले नाही. सावंत यांच्या कार्यपद्धतीने शिवसेना बीथरत चालली आहे. राहिला प्रश्न जिल्हा परिषद कोणाची तर माजी खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील भाजपची हे न समजण्या येवढ नागेंद्र परब निश्चितच दुधखुळे नसतील. परब राज्य सरकार, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर हे जनतेचा विकास आणि महामारीत काम करीत आहेत, असे सांगत आहेत. मग जिल्हा रुग्ण संख्येत एवढा पुढे कसा काय. याच उत्तर परब देतील का. या महामारीत जनतेसाठी सगळेच काम करत आहेत. त्यात आम्ही राजकारण करणार नाही. आणि परब यांनी देखील ते करू नये. जिल्हा परिषद मधील कर्मचारी यांची आरोग्य तपासणी शासकीय नियमानुसार केली जात आहे त्याची काळजी आहे. जिल्हा परिषद कर्मचारी यांचे ९० टक्के लसीकरण झालेले आहे. उर्वरित लसीकरण देखील या महात पूर्ण होणार आहे. त्यामुळे परब यांनी माहिती घेऊन बोलावे उगाचच वरिष्ठांना खूश करण्यासाठी हवेत तीर मारू नये. जिल्ह्यात खणीकर्म निधीतून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यात कोणी विशेष काय केले नाही. जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद सभा यामध्ये रुग्णवाहिका मिळाव्यात म्हणून वेळोवेळी मुद्दा उपस्थित करून गांभीर्य प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. आमची मागणी लक्षात घेत शासनाने आदेश काढत खनिकर्म निधीतून रुग्णवाहिका खरेदी करण्यास मान्यता दिली. यामध्ये आम्ही कसले राजकारण केले नाही आणि खनिकर्म निधी हा राज्य सरकारचा नाही. तर जिल्ह्यातील जनतेचा आहे. यात मोठेपणा परब यांनी मानू नये. जिल्हा परिषद अध्यक्ष सावंत ह्या स्वतःच कौतुक करून घेण्यासाठी काम करत नाहीत. पत्रकार मित्र यांना आपण शब्द देऊन देखील वेळेत लस न दिल्याने पालक मंत्री व शिवसेना नेते मंडळी यांना अपराधीपणा जाणवत आहे. याची जाणीव देखील सगळ्यांना झाली आहे. त्यामुळे परब हे देखील या प्रकरणातील उरलीसुरली पत वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे गावकर म्हणाल्या.
