Headlines

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवणात ३ कोटी ६० लाखांची विकासकामे मंजूर

मालवण (प्रतिनिधी)

मालवण तालुक्यातील विविध गावांमध्ये मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी जनसुविधा व नागरी सुविधांच्या माध्यमातून विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. या कामांसाठी सुमारे ३ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यामुळे ग्रामीण भागातील विविध प्रलंबित विकासकामांना गती मिळणार आहे.

मालवण तालुक्यातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे व विनायक बाईत यांनी आभार मानले आहेत.

मालवण तालुक्यातील नागरिकांना आवश्यक असलेल्या सार्वजनिक सुविधा तसेच विविध नागरी कामांच्या मागण्या स्थानिक पातळीवरून करण्यात आल्या होत्या. या मागण्यांचा पाठपुरावा शिवसेना शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, पं.स. सदस्य, जि. प. सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी- माजी पदाधिकारी यांचा मार्फत सुचवलेली विकास कामे मंजूर करण्यात आली.

विकासकामे मंजूर करताना आमदार निलेश राणे यांनी विशेष लक्ष दिले. त्यांच्या माध्यमातून जनसुविधा व नागरी सुविधांच्या योजनेंतर्गत कामांना मंजुरी मिळवून देण्यात आली आहे. या विकासकामांमुळे तालुक्यातील विविध गावांमध्ये मूलभूत नागरी सुविधांचा विकास होण्यास मदत होणार असून, नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने ही कामे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

मालवण तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सातत्याने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. यापुढेही आवश्यक असलेल्या कामांचा पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे तालुकाप्रमुख मंदार लुडबे व विनायक बाईत यांनी सांगितले.

You cannot copy content of this page