⚡सिंधुदुर्ग, दि. ७- : आद्य क्रांतिकारक, स्वातंत्र्यलढ्यातील पराक्रमी योद्धे राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
राजे उमाजी नाईक यांनी ब्रिटिश सत्तेविरोधात उभारलेल्या संघर्षाचे स्मरण करण्यात आले. स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेले योगदान आणि त्यांचे शौर्य भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त उपस्थितांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
