Headlines

संजू परब यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप…

⚡सावंतवाडी ता.०७-: ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी सुविधा उपलब्ध व्हावी आणि त्यांचा शिक्षणाचा प्रवास अधिक सुलभ व्हावा, या उद्देशाने आरोस पंचक्रोशी विद्या विकास मंडळ, आरोस व शिक्षण प्रसारक मंडळ, आरोस यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले.

सोमवार, दि. ७ सप्टेंबर रोजी आरोस बाजार येथील विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख सच्चिदानंद जगन्नाथ परब (संजू परब) यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर अशोक पाटकर यांच्या सौजन्याने तसेच शिवसेना नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख महेश परब यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी मोठे अंतर पार करावे लागते. अशा गरजू विद्यार्थ्यांना सायकल उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणातील अडचणी कमी करण्याचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. सायकल मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले.
यावेळी जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू मुळीक, शंकर नाईक, बाळा परब, अशोक आंगचेकर, महेश परब यांच्यासह आरोस पंचक्रोशीतील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते, संस्था पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page