तर सचिवपदी रणजीत चौगुले
*💫कणकवली दि.०३-:* महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना शाखा कणकवली तालुका अध्यक्षपदी अव्वल कारकून रमेश कांबळे तर उपाध्यक्षपदी श्रीमती सुचित्रा आडारकर,सचिवपदी रणजीत चौगुले यांची निवड एकमताने करण्यात आली आहे. कणकवली येथे महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना शाखा कणकवली येथे संघटनेची बैठक पार पडली. या बैठकीत नूतन पदाधिकारी निवड करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेमध्ये सचिव (अंशदायी पेन्शन योजना ) म्हणून रमेश कांबळे यांची निवड महसूल संघटना राज्याध्यक्ष हेंमत साळवी व राज्य उपाध्यक्ष विलास कुरणे यांनी यापुर्वीच निवड केलेली आहे . तरीदेखील कणकवली तालुकाध्यक्षपदाची माळ ही त्यांच्या गळयामध्ये महसूल कर्मचाऱ्यांनी घातली आहे.महसूल विभागात त्यांनी चांगली सेवा बजावली.एक अभ्यासू व्यक्तीमत्व ,कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची जाण असल्याने त्याची निवड होताच सर्वानी आनंदोत्सव केला.यावेळी श्री.कांबळे यांनी प्रशासनाच्या सहकार्याने सर्व कर्मचारी यांच्या समस्या सोडण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.तसेच कोरोना रोगाचा प्रार्दुभाव पाहता जनतेच्या सेवेला प्राधान्य देणार असल्याची प्रतिक्रिया अध्यक्ष रमेश कांबळे यांनी दिली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विलास चव्हाण,कोषागार एम.एस.बाबर , श्रीम.एम.एम.तांबे ,श्रीम.के.एस.घाडी , श्रीम.एम.एम.चोपडे ,श्रीम.काटकर , श्रीम.पी.आर मोळे , श्री.मनोज आव्हाड ,श्री.एन.व्ही.कदम , श्रीम.बंडागळे उपस्थित होते . कार्यक्रमाची प्रस्तावना व समारोप श्री.एन.डी.कदम महसूल सहाय्यक यांनी केले तर आभार श्री.डाके यांनी व्यक्त मानले.
