मेडिकल सेवा फक्त राहणार सुरू; सरपंच लखु खरवत यांची प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती*
*दोडामार्ग / सुमित दळवी* दोडामार्ग तालुक्यात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असून आता महसूल देणाऱ्या बाजारपेठाही बंद करण्याची पाळी ही दोडामार्ग तालुका वासीयांवर येऊन ठेपली आहे. दोडामार्ग तालुक्यातील महसूला बाबत सर्वात मोठी समजली जाणारी साटेली भेडशी बाजारपेठेतील आता ५ जून पासून पुढील ११ दिवसांकरिता मेडिकल वगळता इतर सर्व सेवा बंद राहणार आहेत, याबाबत सरपंच लखु खरवत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसात तब्बल १२९ रुग्ण साटेली भेडशी बाजारपेठ परिसरात पॉझिटिव्ह मिळाले होते. यातील ०५ रुग्ण एक्टिव्ह असून अजूनही कोरोनाचा प्रसार वाढतो आहे. यासाठी शासनाबरोबर कोरोना ग्रामस्तरीय नियंत्रण कमिटीने हा निर्णय घेतल्याचे लखु खरवत यांनी प्रसिद्धी पत्रकातून स्पष्ट केले आहे. ५ जून ते १५ जून या कालावधीत मेडिकल वगळता सर्व सेवा बंद राहणार असल्याचे या प्रसिद्धीपत्रकात म्हणण्यात आले असून अवैधरीत्या कोणताही व्यावसायिक व्यवसाय करताना आढळल्यास त्याच्यावरती कारवाई करणार असल्याचे असल्याचेही या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
