मॅजिक थेरपी बाबत तातडीने सकारात्मक भूमिका घ्या…

*आमदार दिपक केसरकर यांची मुंबई येथील आयोजित बैठकीत मागणी; या थेरपीचे अभ्यासक डॉ.रेडकर यांच्या उपस्थितीत झाली बैठक*

मालवण दि प्रतिनिधी कोरोनावर “मॅजिक थेरेपी” ठरणाऱ्या “मिथीलीन “ब्ल्यू” पद्धतीला कोरोना रूग्ण वाढत असलेल्या रेड झोन मधील जिल्ह्यात वापरण्यात यावे, अशी मागणी आमदार दीपक केसरकर यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित उपचार पद्धती बाबत चर्चा करण्यासाठी या थेरपीचे अभ्यासक असलेल्या डॉ. विवेक रेडकर यांच्या उपस्थितीत मुंबई येथे तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही पद्धती स्वस्त असून कमी वेळेत रुग्णाला आराम देणारी आहे. त्यामुळे याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी श्री केसरकर यांनी केली आहे. कोविड आजारावर मॅजिक ड्रग मिथिलीन ब्ल्यू हे सिंधुदुर्गात डॉ. विवेक रेडकर ह्यानी सर्वप्रथम वापरले त्याचे निष्कर्षही त्यानी जाहीर केले. ह्या औषधाचे संयोजन व महत्त्व आम. दिपक केसरकर यांना समजताच त्यानी डॉ. विवेक रेडकर व महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री श्री. राजेश टोपे यांचा भ्रमणध्वनीव्दारे चर्चा घडवून आणली यावेळी आम केसरकर यांनी सिंधुदुर्ग व महाराष्ट्रातील ‘रेड झोन’ मधील सर्व जिल्हे ह्या कठीण परिस्थितीत आहेत. अशा स्वस्त व गुणकारी औषधाची Emergency use authorisation साठी परवानगी द्यावी म्हणून आरोग्य मंत्र्यांना विनंती केली. आरोग्य मंत्र्यांनी डॉ. रेडकर व टास्क फोर्सची तात्काळ बैठक आपल्या उपस्थितीत ठेवली असून डॉ. रेडकर यांना त्वरित मुंबईला बोलावून घेतले आहे. आम केसरकर यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल डॉ रेडकर यांनी त्यांचे आभार मानले

You cannot copy content of this page