वाढदिवस कर्तृत्वाचा…_

वाढदिवस नेतृत्वाचा;वाढदिवस उत्तुंग ध्येयाचा

*💫मालवण दि.०२-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आपल्या धडाकेबाज कार्याने आपली कर्तृत्व मोहोर उमटवणाऱ्या मा. सुनीलजी घाडीगांवकर यांना वाढदिवसाच्या ग्लोबल महाराष्ट्र न्यूज तर्फे वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा कोकणचे भाग्यविधाते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार माननीय नारायणराव राणे यांनी या संपूर्ण कोकणपट्टीसह अवघ्या महाराष्ट्राचे राजकारण बांधताना लाखो कार्यकर्ते घडवले.. नारायणराव राणे यांनी दाखवलेल्या वाटेवरून चालणाऱ्या कार्यकर्त्यांमधला एक लक्षवेधी चेहरा म्हणजे सुनील घाडीगांवकर ! शिरवंडे या मालवण तालुक्यातील गावाचा उच्चार केला की जसा तो हिरवागार निसर्ग आठवतो तसाच गावखेड्यात राहूनही तालुका आणि जिल्हा पातळीवर आपली छाप सोडणारा चेहरा म्हणून सुनील घाडीगावकर यांचा उल्लेख आवर्जून करायलाच पाहिजे ! १९९० साली नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सुनील घाडीगांवकर यांचा राजकीय प्रवास सुरु झाला.राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिरवंडे गावचे शाखाप्रमुख म्हणून सुनील घाडीगांवकर यांचा सुरू झालेला राजकीय प्रवास तालुका सभापती पदापर्यंत गेलाच आणि आजही तो अव्याहतपणे सुरू आहे ! घाडीगांवकर यांच्यातल्या धडपड्या गुणांची पारख राणे साहेबांनी अचूक हेरली आणि पंचायत समिती सदस्य म्हणून नेतृत्व करण्याची संधी दिली. आणि तिथूनच खऱ्या अर्थाने सुनील घाडीगांवकर यांचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. गावचे सरपंच, परत पंचायत समिती सदस्य, सभापती, त्यानंतर पत्नी सोनाली घाडीगांवकर यांच्यावर जिल्हा परिषद सदस्यत्वाची जबाबदारी, आता २०१७ पासून स्वतः पंचायत समिती सदस्य व सभागृह गटनेते ही जबाबदारी घाडीगांवकर समर्थपणे सांभाळत आहेत. केवळ आपल्याच नाही तर जिथे दादांचा आदेश त्या प्रत्येक निवडणूकित आपला मतदारसंघ हा कायम बालेकिल्ला राहिलाच पाहिजे हा कटाक्ष घाडीगांवकर यांनी आजही कार्यकर्ता म्हणून जपलाय..सभागृहांपासून ते सोशल मीडियापर्यंत विरोधकांना पुरून उरणारा हा ढाण्या वाघ आपली ओळख निर्माण करतोय त्याचवेळी विकास कामात विरोधाचे राजकारण बाजूला ठेवून सुनील घाडीगांवकर आज संपन्न राजकारणाची मोट बांधतायत मा.नारायणराव राणे, मा. निलेशजी राणे, मा. नितेशजी राणे त्याचप्रमाणे मा दत्ता सामंत यांच्या विकासाभिमुख राजकारण पर्वाने निर्माण केलेला हा कार्यकर्ता आजही स्वतःला आपण केवळ दादांचा कार्यकर्ता हीच ओळख मिरवतोय.. आज शिरवंडे गाव विकासाच्या नव्या योजना राबवताना आदर्श गावचे रोल मॉडेल बनावे हाच ध्यास सुनील घाडीगांवकर बाळगून आहेत.. दादांचा बालेकिल्ला आणि विकासाचा गडकोटाचा हा शिरवंडे पॅटर्न लवकरच सुनील घाडीगांवकर यांना नव्या यशाला गवसणी घालणारा ठरला ग्लोबल महाराष्ट्र परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

You cannot copy content of this page