कोविड काळातील कार्याबद्दल केला सत्कार*
*💫सावंतवाडी दि.०१-:* सावंतवाडी तालुक्याचे डॅशिंग तहसीलदार राजाराम म्हात्रे यांचा आज सुवर्ण महोत्सवी(५०) वाढदिवस!कोविड संकटाच्या काळात त्यांनी केलेले काम कौतुकास्पद असेच आहे. गेल्या तीन वर्षात त्यांनी तळागाळातील व सर्वसामान्य लोकांसाठी दखलपात्र काम केले आहे. गेल्या तीन वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात तालुक्यात मुसळधार पावसामुळे,विविध चक्रीवादळे व गेले वर्षभर कोविड संकट आले आहे. परंतु या कालावधीत त्यांनी केलेले काम हे सामाजिक बांधिलकीचे आहे.यावेळी त्यांनी वेळप्रसंगी स्वतःच्या खिशातून सर्वसामान्य लोकांना मदत केली. रात्री अपरात्री सर्वांसाठी तत्पर असणाऱ्या या व्यक्तिमत्वाच्या कार्यास गौरविण्यासाठी आज दि.०१ जून रोजी भोसले पॉलिटेक्निक, चराठे येथे कोविड बाधितांची विचारपूस सुरू असतांना “छावा युवा संघटने ‘च्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्या कोविड काळातील उत्कृष्ट कार्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सावंतवाडी पं.समिती सभापती सौ.निकिता सावंत,छावा युवा संघटनेचे अध्यक्ष शैलेश मयेकर,कार्याध्यक्ष संजय पिळणकर, सह सचिव मदन मुरकर,संपर्क प्रमुख नयनेश गावडे, महिला तालुका उपाध्यक्ष अस्मिता भराडी, आनंद गावडे, विलास गावडे आदी उपस्थित होते.
