शेर्लेत चरात पडून तरुणाचा मृत्यू

पाईपलाईनसाठी खोदलेला चर धोकादायक

*💫बांदा दि.०१-:* शेर्ले – मेस्त्रीवाडी येथील परेश बाळकृष्ण मेस्त्री (३५) या तरुणाचा पाईपलाईनसाठी खोदलेल्या चरातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. सोमवारी संध्याकाळी परेश शेतात गेला असता पाय घसरुन तोल गेल्याने चरात पडला असावा अशी शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली. शेर्ले भुतनाथ मंदिरानजीक सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. आज सकाळी शोधाशोध केली असता परेशचा मृतदेह चरातील पाईपलाईनमध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला आहे. परेशच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ, पुतण्या असा परिवार आहे. याबाबतची माहिती सरपंच उदय धुरी यांनी दिली.

You cannot copy content of this page