विकी चोपडेकर यांची मागणी
मालवण (प्रतिनिधी) तौक्ते चक्रीवादळामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. यात सिलिंडर नौका, बिगर यांत्रिक नौकांचे पंचनामे करण्यात आले आहेत. मासे खारविणारे, मासे विक्रेते, छोटे मच्छीमार या सर्व मच्छीमारांची जाळी व इतर वस्तूंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांचेही पंचनामे करून शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी मालवण मच्छीमार सहकारी संस्थेचे चेअरमन विकी चोपडेकर यांनी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
