अकराच्या सुमारास कारवाई होत असल्याने व्यापारी वर्गात नाराजी
*दोडामार्ग/ सुमित दळवी* दोडामार्ग तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे यावर नियंत्रण आणण्यासाठी कसई दोडामार्ग नगरपंचायत महसूल पोलिस प्रशासनाने बाजारपेठेत रस्त्यावर फिरणाऱ्यांची रॅपीड टेस्ट सुरू केली आहे. ही कारवाई फक्त अकरा च्या सुमारास सुरू केली जात आहे आणि एक तासात पुन्हा जैसे ते,अकरा वाजता दुकाने बंद करून जाईपर्यंत यांची टेस्ट सुरू होते मग व्यापाऱ्यांनी दहा वाजताच दुकाने बंद करावी का? हा प्रश्न व्यापारी वर्गाला पडला आहे त्यामुळे सर्व सामान्य नागरिक व्यापारी यांच्यात तीव्र नाराजी दिसून येत आहे. सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत दुकाने सुरू असल्याने लोक बाजारपेठेत येतात पण नगरपंचायत पोलिस महसूल प्रशासन नाहक रॅपीड टेस्ट तसेच दुचाकी वाहन धारकांना वेठीस धरून दंडात्मक कारवाई करत आहेत, त्यामुळे सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने अकरा वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई नागरीक वाहन धारक यांच्यावर करु नये अन्यथा दुकाने बंद ठेवा कोण बाजारपेठेत येणार नाही. असी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
