शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने केले सन्मानित
*💫वेंगुर्ले दि.३१-:* शिरोडा हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक अजित धारगळकर यांचा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. शिरोडा येथील गुरुवर्य वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठान संस्थेचे सचिव, गुरुवर्य अ.वि. बावडेकर विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक, शिक्षकेतर मित्र अजित वासुदेव धारगळकर हे नियत वयोमानानुसार बत्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज शिरोडा हायस्कूल मधून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे अजित धारगळकर यांचे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष अनिल राणे, जिल्हा सचिव गजानन नानचे, आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त माजी मुख्याध्यापक आनंद सावंत, माजी मुख्याध्यापक अवधूत एनजी, संस्थाचालक अजित नाईक, सहाय्यक शिक्षक एम. एल.जाधव सत्कारमूर्ती अजित धारगळकर सौभाग्यवती धारगळकर उपस्थित होते. धारगळकर यांनी शिरोडा हायस्कूल मध्ये ३२ वर्ष सेवा करून ज्ञानदानाचे कार्य केले. तसेच ते तीन वर्षापासून संस्थेचे सचिव म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. ते शिक्षकेतर मित्र म्हणून सुद्धा ओळखले जातात. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी असलेले त्यांचे ऋणानुबंध कायम ठेवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित यांनी आपली मनोगते व्यक्त करून पुढील भावी जीवनात त्यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्कार दिल्याने तसेच त्यांच्या मित्र मंडळी व सहकाऱ्यांनी सुद्धा त्यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव केला त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
