*जिल्हा परिषदच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आवाज उठवल्यानेच मिळाल्या १२ ॲम्बुलन्स

जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी व्यक्त केले मत

*💫सिंधुदुर्गनगरी दि.३१-:* जिल्हा परिषद सिंधुदुर्ग कडील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ॲम्बुलन्स मिळणेबाबत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग च्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. याचेच फलित म्हणजे जिल्हा खनिकर्म विभागाकडून 12 ॲम्बुलन्स जिल्हा परिषद साठी मंजूर झालेल्या आहेत. ग्रामीण भागातील वैद्यकीय व्यवस्था कार्यक्षम बनवण्यासाठी आधुनिक पद्धतीच्या ॲम्बुलन्स गरजेच्या होत्या. सन 2004 नंतर शासनाकडून जिल्हा परिषदेस ग्रामीण भागात प्रा. आ. केंद्रांसाठी गरज असताना देखील उपलब्ध करून दिल्या नाहीत. याबाबत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग कडून वेळोवेळी आरोग्य समिती, स्थायी समिती, जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा मध्ये आवाज उठवण्यात आला होता. मुळात यापूर्वीच येथील आरोग्य यंत्रणेचा विचार करून शासनाने ॲम्बुलन्स देणे गरजेचे होते. 2004 पासून जिल्हा परिषदेस ॲम्बुलन्स ची प्रतीक्षा करावी लागली.जिल्हा परिषद कडून नियमित होणाऱ्या पाठपुराव्यामुळे व सतत आवाज उठवल्यामुळे शासनास या ॲम्बुलन्स देणे भाग पडले असे जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी सांगितले. सदर ॲम्बुलन्स चे लोकार्पण करण्यात येत असल्याचे मा. अध्यक्ष सावंत म्हणाल्या. या लोकार्पण सोहळ्यात प्राथमिक आरोग्य केंद्र वैभववाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र मळेवाड, प्राथमिक आरोग्य केंद्र कळसुली, प्राथमिक आरोग्य केंद्र शिरगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र मोंड , प्राथमिक आरोग्य केंद्र वरवडे या ठिकाणी अंबुलन्स उपलब्ध करून देण्यात या वितरण कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रजित नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, सभापती महिला व बाल विकास श्रवानी गावकर, सभापती वित्त व बांधकाम महेंद्र चव्हाण, जिल्हा परिषद भाजप गटनेते रणजित देसाई , उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य राजेंद्र पराडकर, जिल्हा परिषद सदस्य रेश्मा सावंत उपस्थित होते.

You cannot copy content of this page