जिल्हा व तालूका टास्क फोर्सची स्वतंत्र निर्मितीसोमवारी पहिली बैठक संपन्न
जिल्हा परिषदेने कोरोना संक्रमण रोखण्यासाठी ग्रामीण भागांत नियंत्रण राखण्यासाठी टास्क फोर्स समिती स्थापन केली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती टास्क फोर्सची पहिली बैठक ऑनलाईन पद्धतीने पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे जाळे जिल्ह्यात जास्त असल्याने जास्त एग्रेसिवहाली काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मोठ्या गावांत कोरोना रुग्णासाठी स्वतंत्र विलगिकरण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेत छोट्या चार ते पाच गावांनी मिळून एक कक्ष सुरु करावा. यामध्ये सहभागी ग्राम पंचायतींनी वित्त आयोगाचा २५ टक्के अबंधित निधी खर्च करावा. तसेच या विलगिकरण कक्षात प्रत्येक ग्राम पंचायतने एक एक दिवस ड्यूटी लावावी, अशा सूचना जिल्हा परिषद टास्क फोर्स अध्यक्ष या नात्याने संजना सावंत यानी केल्या. या बैठकीला सह अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, सभापती महेंद्र चव्हाण, शर्वाणी गांवकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलिपे, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, महिला व बाल विकास विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटील, जिल्हा परिषद सदस्य रणजीत देसाई, यांच्यासह तालूका सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी, सहाय्य्यक गटविकास अधिकारी, तालूका आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी पराडकर यानी टास्क फोर्सची संकल्पना अध्यक्षा संजना सावंत यांची असल्याचे सांगत आपल्याला टेस्ट संख्या वाढवायची असून बाधित रुग्णाना तात्काळ उपचाराखाली आणून वाढलेला मृत्यु दर कमी करायचा असल्याचे आवाहन केले.
