*💫बांदा दि.३१-:* चक्रिवादळाच्या तडाख्यात मडुरा गावातील बंद झालेला पाणीपुरवठा अद्यापही सुरळीत न झाल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. वीज पुरवठा सुरळीत होऊन देखील पाणीपुरवठा बंद असल्याने हंडाभर पाण्यासाठी महिलावर्गाला पायपीट करावी लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांमधून होत आहे. मडुरा बाबरवाडी, डिगवाडी, रेडकरवाडी, देऊळवाडी, भरडवाडी मधील सुमारे 200 लाभधारकांना सुकळकोंड येथील विहिरीमधून होत असलेला पाणीपुरवठा बंद आहे. दरम्यान, सरपंच साक्षी तोरसकर यांच्याशी संपर्क न झाल्याने उपसरपंच विजय वालावलकर यांच्याशी संपर्क साधला असता चक्रीवादळामुळे पाणी पंपाच्या मोटारीमध्ये बिघाड झाला असून आज संध्याकाळी मॅकेनिकल येणार आहे. त्यामुळे आज उशीरापर्यंत पाणी पुरवठा सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मडुऱ्यातील पाच वाड्यांचा पाणी पुरवठा ठप्प…
