सावंतवाडी, ता. ०५: ओवळीये जंगलात शिकारीसाठी गेलेल्या
युवकाला सहकाऱ्याच्या बंदुकीची गोळी लागून तो ठार झाला आहे. ही घटना आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास जंगलात घडली. सचिन मर्गज (वय २८ रा. सांगेली, ता. सावंतवाडी) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी संशयित म्हणून सुप्रियान डान्टस (रा. कोलगाव, वय ४५) याला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांकडून देण्यात आली.
ओवळीये जंगलात गोळी लागून युवकाचा मृत्यू…
