जुनाट वीज खांब थेट एसटी बसवर कोसळला; मोठी दुर्घटना टळली…

⚡मालवण ता.०५-:
मालवण भरड येथील गेल्या कित्येक वर्षांपासून उभा असलेला जुनाट गंजलेला वीजेचा खांब आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास थेट एसटी बसवरच येऊन कोसळल्याची घटना घडली. यामध्ये सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही काही वेळाने वीज वितरण कंपनीकडून कलंडलेला पोल पुन्हा उभा करण्यात आला.

मालवण एसटी डेपोच्या दोन गाड्या सहलीसाठी गेल्या होत्या. या दोन्ही गाड्या आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास पुन्हा बस स्थानकात जात असताना भरड परिसरात दत्त मंदिर नजीकच्या रस्त्यावर असलेला जुनाट वीज पोल थेट एसटीवर येऊन कलंडला. यामुळे वीज तारा देखील ओढल्या गेल्या. मात्र, सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. या अपघातामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. तसेच यावेळी या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. याबाबत वीज वितरण कंपनीला माहिती दिल्यावर वीज कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत कलंडलेला वीज पोल पुन्हा उभा केला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

You cannot copy content of this page