अरविंद मोंडकर:रवींद्र चव्हाण यांनी दुसऱ्यांदा घेतलेल्या अशा भूमिकेवरून हे सिद्ध होत आहे की त्यांचं राणें समोर काही चालणार नाही..
⚡मालवण ता.०५-:
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना आमदार निलेश राणे यांच्या समोर झुकावं लागतंय ही सिंधुदुर्ग मधील भाजपासाठी शरमेची बाब आहे, अशी टीका राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे.
गेल्या काही वर्षात सावंतवाडी येथील युवा कार्यकर्ते विशाल परब यांना प्रदेश युवा मोर्चात दिल गेलेलं स्थान आणि त्यांनतर निलेश राणे – रवींद्र चव्हाण यांच्यात सुरु झालेल्या कुरघोडी यांवर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली होती आणि त्यानंतर स्वतः प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घेतं मुंबईत प्रेस ला सामोरे जातं यावर पडदा टाकला होता. आता नगरपालिका निवडणूक निमित्ताने जिल्ह्यातील निवडणूका लढताना आमदार निलेश राणे यांनी भाजपच्या लक्ष्मी दर्शन मोहीम विरोधात घेतलेली भूमिका पाहता तसेच मालवण, सावंतवाडी मधील भाजपा कार्यकर्त्यांना शिकवलेला धडा पाहता पुन्हा वाद वाढू नये म्हणून आज भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन स्वतः प्रथम प्रेस घेतं झालेल्या घडामोडी वर पडडा टाकण्याच्या प्रयत्न करत आहेत. रवींद्र चव्हाण यांनी दुसऱ्यांदा घेतलेल्या अशा भूमिकेवरून हे सिद्ध होत आहे की त्यांचं राणें समोर काही चालणार नाही, सत्ताधारी प्रदेशाध्यक्ष सारख्या माणसाने सलग दुसऱ्यांदा स्वतःहून प्रेस समोर जाणे म्हणजे जिल्ह्यातील भाजपाला ही शरमेची बाब आहे, असे अरविंद मोंडकर यांनी म्हटले आहे.
