⚡सावंतवाडी ता.०५-: निरवडे येथे मागील आठवड्यात पार पडलेल्या मळगाव केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत शारदा विद्यामंदिर सावळवाडा शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
केंद्रस्तरीय बाल कला व क्रीडा महोत्सव २०२५ अंतर्गत या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यात शारदा विद्यामंदिर, सावळवाडा शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. यात ५० मीटर धावणे-लहान गट मुलगे-प्रथम क्रमांक-मंथन महादेव हरमलकर, द्वितीय क्रमांक-तनीष न्हानू सावळ, उंचउडी लहान गट मुलगे- प्रथम क्रमांक-राज पांडुरंग बुगडे, तृतीय क्रमांक-मंथन महादेव हरमलकर, लांबउडी लहान गट मुलगे-प्रथम क्रमांक-तनीष न्हानू सावळ यांनी यश मिळविले. तसेच ५०×४ रिले लहान गट- उपविजेता, ५० मीटर धावणे-लहान गट मुली-प्रथम क्रमांlक-शुभ्रा परशुराम गवंडे, १०० मीटर धावणे-लहान गट मुली-तृतीय क्रमांक-अनुष्का देवदास गवंडे, उंचउडी लहान गट मुली-प्रथम क्रमांक-अनुष्का देवदास गवंडे, लांबउडी लहान गट मुली-प्रथम क्रमांक-शुभ्रा परशुराम गवंडे, द्वितीय क्रमांक-कार्तिकी आत्माराम सावळ, कबड्डी लहान गट मुली-उपविजेता, १०० मीटर धावणे-मोठा गट मुलगे-द्वितीय क्रमांक-वसंत प्रकाश सावळ, उंचउडी मोठा गट मुलगे-द्वितीय क्रमांक-ओम विष्णू सावळ. लांबउडी मोठा गट मुलगे-तृतीय क्रमांक-वसंत प्रकाश सावळ, लांबउडी मोठा गट मुली-प्रथम क्रमांक-आर्या विजय भगत, तृतीय क्रमांक-आर्या प्रकाश सावळ यांनी यश संपादन केले. सर्व विजेत्या आणि उपविजेत्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे माजी विद्यार्थी, पालक, शिक्षकवृंद आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्यावतीने अभिनंदन करून पुढील तालुकास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत मळगाव सावळवाडा येथील शारदा विद्यामंदिर शाळेचे उल्लेखनीय यश…
