⚡मालवण ता.०५-: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मालवण येथील फुले, शाहू आंबेडकर विचार मंच यांच्या वतीने आदरांजली कार्यक्रम दि. ६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सायंकाळी ७ वा. मालवण एसटी बस स्थानक मागील समाज मंदिर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बांगीवाडा अशी भीम ज्योत मिरवणूक काढण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन फुले शाहू आंबेडकर विचारमंचने केले आहे.
मालवणात उद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदरांजली कार्यक्रम ; भीम ज्योत मिरवणूकीचे आयोजन…
