⚡मालवण ता.०५-:
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची सन २०२५-२६ सालची किशोर-किशोरी विभागाची ३९ वी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा मुंबई खो खो संघटना व श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर – मुंबई यांच्या यजमान पदाखाली दि. २५ ते २८ डिसेंबर या कालावधीत शिवाजी पार्क. दादर (प.). मुंबई येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दि अमॅच्युअर खो खो असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा दि. ७ डिसेंबर रोजी सकाळी ९ मालवण वायरी येथील रेकोबा हायस्कुल मध्ये आयोजित केली आहे. ही स्पर्धा १४ वर्षा वर्षाखालील मुले- मुली यांच्यासाठी असणार आहे.
या स्पर्धेसाठी प्रवेशिका अंतिम मुदत ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा, क्लब व संस्था इत्यादीना प्रवेश मिळेल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी प्रवेश अर्ज ९७६७५९२१६० / ९४२२३९२७९० या क्रमांकावर पाठवावेत, असे आवाहन असे आवाहन दि अमॅच्युअर खो खो असोसिएशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष अमित सामंत व सचिव संजय पेंडूरकर यांनी केले आहे.
