कोरोनाला रोखण्यासाठी जिल्ह्यात राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक देण्यात यावे…

प्रफुल्ल सुद्रीक यांची प्रसिद्धी पत्रकातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी_

*💫कुडाळ दि.३१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला असून त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात वाढत आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक देण्यात यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे. या प्रसिध्दी पत्रकात सुद्रीक यांनी म्हटले की, सिंधुदुर्गात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता ती रोखण्यासाठी राज्य सरकारने अन्य जिल्ह्यातील डाँक्टरांचे पथक तातडीने सिंधूदूर्गात पाठवणे आवश्यक आहे. तोक्ते वादळामध्ये वीज वितरणचे हजारो पोल रस्त्यावर पडून लाईन तुटल्याने जिल्ह्य़ात महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशा परिस्थितीत वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सिंधूदूर्ग महावितरणकडे पुरेसे मनुष्यबळ नव्हते. मात्र जिल्ह्य़ातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी बारामती, कराड, सांगली, सातारा या जिल्ह्य़ातून जादा मनुष्यबळ राज्य सरकारने उपलब्ध करून महावितरणला आणि वीजग्राहकांना जसे सहकार्य केले त्याचप्रमाणे महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्य़ात कोरोना रूग्ण संख्येत घट झाली आहे. तेथील डाँक्टरांचे पथक जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पाठविण्यात यावे, असे असे पत्रकात नमूद केले आहे.

You cannot copy content of this page