शिरोडा समुद्रकिनारी आज सकाळी एक मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला…

पोलीस घटनास्थळी दाखल_

*💫वेंगुर्ले दि.३१-:* दोन दिवसा पूर्वी वेंगुर्ला तालुक्यातील आरवली – सागरतीर्थ समुद्रकिनाऱ्यावर एक पुरुष जातीचा अनोळखी मृतदेह आढळून आला होता, ही घटना ताजी असतानाच आज 31मे रोजी सकाळी शिरोडा समुद्रकिनारी एक अनोळखी मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला आहे. शिरोडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याबाबत सागर सुरक्षा रक्षक सुरज अमरे यांनी वेंगुर्ला -शिरोडा पोलिसाना याबात माहिती दिली आहे. मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याने अद्याप ओळख पटलेली नाही. शिरोडा पोलीस नाईक व्हाय एम वेंगुर्लेकर आणि जाधव घटनास्थळी दाखल झाले आहेत.पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कारवाई करणार आहे.

You cannot copy content of this page