शिवसंग्रामच्या बैठकीत निर्णय
*💫कुडाळ दि.३१-:* मराठा आरक्षणावर चांगलीच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.५ जून ला बीड येथे निघणाऱ्या मराठा आरक्षण संबंधी शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे व महाराष्ट्र राज्याचे सचिव मुंबई प्रदेश अध्यक्ष सत्यवान भाई राऊत यांच्या सुचनेनुसार ३० मे ला शिवसंग्रामचे सिंधुदुर्ग जिल्हाचे अध्यक्ष श्री.अशोक सावंत यांच्या निवासस्थानी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक पार पडली. आरक्षणाबाबत चर्चा करण्यात आली.५जून ला होणाऱ्या बैठकीच नियोजन करण्यात आले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जास्तीत जास्त लोक नेण्यासंबंधी पुढील दिशा ठरविण्यात आली. मराठा आरक्षण मोर्च्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जास्तीत जास्त मराठा बांधवांनी सहकार्य करावे असे आवाहन शिवसंग्राम संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री अशोक खेमा सावंत यांनी केले आहे.
