पोरक्या मुलांच्या शिक्षणासाठी महाविकास आघाडीची मदत…

एका मुलाची वर्षभराची घेतली जबाबदारी_

*💫बांदा दि.३०-:* कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घरातील कमावता कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने आई वडिलांविना पोरके झालेल्या त्या मुलांवर पर्यायाने कुटुंबावर मोठे संकट आले होते. मात्र महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दखल घेत त्या कुटुंबातील एका मुलाची वर्षभराची शिक्षणाची जबाबदारी घेण्यात आली आहे. शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महिंद्र सांगेलकर यांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन त्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांना आर्थिक मदत करत दिलासा दिला. तसेच त्या कुटुंबातील एका मुलाच्या एक वर्षाच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी देखील महाविकासआघाडी तर्फे घेण्यात आली आहे. यावेळी शिवसेना नगरसेवक बाबू कुडतरकर, उपसरपंच काका चराटकर, माजी उपसरपंच कृष्णा सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप कोठावळे आदी यावेळी उपस्थित होते. कोरोनामुळे अनेक नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यात पोरकेपणा आलेल्या मुलांना मायेचा, शिक्षणाचा तसेच नोकरी धंद्याचा हात दिल्यास मोलाचे ठरेल, अशा प्रतिक्रिया सावंतवाडी तालुक्यातील नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.

You cannot copy content of this page