*रस्त्यांवर सापडलेला मोबाईल मालकास दिला परत*
*💫मालवण दि.३०-:* मालवण शहरातील बाजारपेठेतील आचरेकर गल्ली येथील रस्त्यावर पडलेला मोबाईल भरत तारी यांनी मालकास परत करत प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले. याबाबत दीपा वनकुद्रे यांनी त्यांचे आभार मानले. भरड भागात राहणाऱ्या दीपा वनकुद्रे यांनी आपला मोबाईल गाडीवर ठेवला होता. त्यांचे दिर गाडी घेऊन गेले असताना हा मोबाईल वाटेत पडला. मोबाईल पडल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी मोबाईलवर संपर्क साधण्यास सुरवात केली. यात एका मुलाने फोन उचलत भरत तारी यांना मोबाईल सापडला असल्याचे सांगितले. तारी यांना बोलता येत नसल्याने त्यांनी त्या मुलासोबत भरड नाका येथे जात मोबाईलच्या मालक दीपा वनकुद्रे यांना मोबाईल परत केला. याबाबत सौ. वनकुद्रे यांनी श्री. तारी यांचे आभार मानले.
