Headlines

मळेवाड-कोंडूरेतील विलगिकरण कक्षाचे उद्या उद्घाटन

तहसीलदार म्हात्रे यांच्याहस्ते होणार शुभारंभ

*💫सावंतवाडी दि.२९-:* ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेने उभारलेल्या विलगीकरण कक्षाचा र रविवारी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.गावागावात रुग्णांची संख्या वाढत असल्याने सरकारने होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गावातील ग्रामपंचायत ने ग्रामस्तरावर शासकीय शाळांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाने सर्व ग्रामपंचायतना दिल्या आहेत. त्याला अनुसरून ग्रामपंचायत ने राणी पार्वतीदेवी विद्यालय मळेवाड शाळा नंबर 1 मध्ये पंधरा बेडचा विलगीकरण कक्ष उभारला आहे. या कक्षाचा शुभारंभ रविवारी सकाळी साडेदहा वाजता सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या शुभहस्ते होणार आहे यावेळी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, पोलीस निरीक्षक फुलचंद, सरपंच हेमंत मराठे,ग्राम विस्तार अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, सर्व ग्रामपंचायत सदस्य पोलिस पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शुभारंभ होणार आहे. रविवारपासून हा कक्ष रूग्णांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहे. जिल्ह्यातील सुसज्ज व सर्व सोयींनी युक्त असा हा कक्ष असून रुग्णांना जास्तीत जास्त सेवा या कक्षात देण्यास व ग्रामपंचायत सरपंच हेमंत मराठे यांनी भर दिला आहे.

You cannot copy content of this page