मटका जुगार खेळत असल्याच्या आरोपातून मुक्तता…

जप्त रक्कम आरोपीला परत देण्याचा आदेश..

कुडाळ : तालुक्यातील नेरूर येथील मुंबई मटका जुगार खेळत असल्याच्या आरोपातून एकाची कुडाळ न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्याच बरोबर जप्त रक्कम परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अशी माहिती वकील यांनी दिली आहे.

याबाबत वकील राजीव बिले यांनी दिलेल्या माहिती नुसार, नेरूर येथील एकटा  हा  मुंबई मटका जुगार खेळत असून या जुगाराकरिता लोकांजवळ पैसे घेतो अशी माहिती मिळाले वरून दिनांक २२ जुलै २०२५ रोजी पोलीस निरीक्षक मगदूम यांनी आरोपी याला रंगेहात पकडले. आरोपी जवळ जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम रुपये 860/-जप्त केले. आरोपी विरुद्ध जुगार अधिनियम कलम 12 अ प्रमाणे फिर्याद दाखल केली होती. आरोपीतर्फे ॲड. राजीव बिले  ॲड. दत्ताराम बिले आणि ॲड. हेमांगी वराडकर यांनी काम पाहिले. या गुन्ह्यात जप्त रक्कम रुपये 860/- आरोपीला परत करावी असा आदेश करून आरोपीची कुडाळच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी  श्रीमती एन. ए. बकरे यांनी  निर्दोष मुक्तता  केली.
You cannot copy content of this page