धनगर समाजाच्या पारंपरिक नृत्य कलेचा सिंधुदुर्ग महोत्सव लवकरच…

विचार मंचाच्या सभेत एकमुखी ठराव..

⚡वैभववाडी ता.०१-: धनगर समाज विचार मंच सिंधुदुर्ग यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगर समाजाच्या पारंपारिक नृत्य कलाचा सिंधुदुर्ग महोत्सव येत्या काही महिन्याभरात भरवणार असल्याचा एकमुखी ठराव सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 301 जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाल्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक पतसंस्था सभागृहात विचार मंच सिंधुदुर्ग जिल्ह्याची सर्वसाधारण सभा जिल्हाध्यक्ष एकनाथ जानकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी माजी अध्यक्ष तथा माजी गटविकास अधिकारी आर डी जंगले माझी पोलीस उपनिरीक्षक बापू खरात भवन समितीचे अध्यक्ष कानू शेळके, सचिव संतोष बोडके, विचार मंचाचे सल्लागार लक्ष्मण शेळके, शिक्षक नेते पांडुरंग काळे, माझी नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, मंडळ अधिकारी संतोष गुरखे, केंद्रप्रमुख देऊ जंगले, नवलराज काळे, सचिव रामचंद्र डोईफोडे, विजय खरात संतोष साळसकर, राजेंद्र माने धाकू झोरे, दीपा ताटे विशाखा काळे स्वप्नाली शेळके सुवर्ण झोरे व माजी सरपंच सौ वरक मॅडम आधी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये धनगर समाज विचार मंचाच्या वतीने येत्या काही महिन्यात धनगर महोत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्याचं एक मताने ठरले व गेली दोन वर्ष विचार मंच रजिस्टर करण्याचे काम थांबले असून हे तात्काळ पूर्ण करण्यात यावे अशी सुचेना देण्यात आली. मागील जमाखर्चाचा तपशील देण्यात आला. विचारमंचचे खजिनदार पद रिक्त होती हे पद सर्वसाधारण सभेतून भरण्यात यावे अशी सर्वांनी मागणी केल्यानंतर खजिनदारपदी धाकू झोरे तर कणकवली प्रतिनिधी म्हणून राजेंद्र माने तर महिला प्रतिनिधी म्हणून दीपा ताटे व विशाखा काळे यांची एकमताने निवड करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे व सभेचे सूत्रसंचालक देऊ जंगले यांनी केले तर आभार रामचंद्र डोईफोडे यांनी धनगरी भाषेत मानले.

You cannot copy content of this page