शहराचा विकासाचा आराखडा जनतेसमोर मांडण्याआधी प्रशासनाची मान्यता घ्या…

संजू परब यांचा नगराध्यक्षांना टोला: चुकीचे गैरसमज पसरून जनतेमध्ये दिशाभूल करू नये..

⚡सावंतवाडी ता.२९-: शहराच्या विकासासाठी नगराध्यक्षांनी मांडलेला आराखडा चुकीचा असून तो जनतेसमोर मांडण्यापूर्वी नगरसेवकांसोबत चर्चा करून त्यांच्या सूचना विचारात घ्याव्यात, तसेच प्रशासनाची मान्यता घेतल्यानंतरच तो जाहीर करावा, असा टोला सावंतवाडी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी लगावला.

याबाबत बोलताना श्री. परब म्हणाले, “शहरासाठी यापूर्वी करण्यात आलेल्या घोषणा आणि प्रलंबित कामे आधी पूर्णत्वास न्यावीत. त्यानंतरच नवीन विकास आराखड्याबाबत भाष्य करावे. कोणतीही प्रशासनिक मान्यता नसताना आराखडा जनतेसमोर मांडणे योग्य नाही. त्यामुळे प्रथम संबंधित प्रशासनाची मंजुरी घ्यावी आणि त्यानंतरच तो नागरिकांसमोर सादर करावा.”
तसेच, “जनतेची दिशाभूल होईल अशा पद्धतीने केवळ आपण काहीतरी करत आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करू नये,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page