⚡कणकवली ता.२८-: कणकवली भालचंद्र महाराज मठाचे आचारी भरत उर्फ बाळा म्हाडगुत यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी त्यांच्या बाजारपेठ येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री. म्हाडगुत यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक प्रसाद अंधारी, वैभव मालंडकर, निकित मुरकर आदी उपस्थित होते. उपस्थितांनी श्री. म्हाडगुत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व धार्मिक कार्याचे कौतुक केले.
