⚡ओरोस ता २८-: महाराष्ट्र राज्य काजू परिषदेच्या माध्यमातून पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर या पाच जिल्हयांमध्ये प्रत्येकी एक निर्यात केंद्र, काजू बाजार केंद्र, प्रक्रिया प्रकल्प, गोदाम व इतर संबंधित पायाभूत सुविधांसाठी मध्यवर्ती सुविधा केंद्र उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून काजू फळ पीक विकास योजना राबविण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य काजू परिषदेचे तज्ञ संचालक मनीष दळवी यांनी दिली आहे.
या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाकडून आवश्यकती किमान २५ एकर जागा उपलब्ध करून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य काजू परिषदेकडून प्रयत्न सुरू आहेत. सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये शासकीय जागेत हा प्रकल्प उभारणीसाठीचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी शासकीय जागेची मागणी महाराष्ट्र राज्य काजू परिषदेकडून शासनाकडे करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हयातील हलकर्णी एमआयडीसी परिसरातील हा प्रकल्प मंजूर आहे. प्रकल्प कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व पालघर या जिल्ह्यांमध्ये सुध्दा प्रस्तावित आहेत.
सिंधुदुर्गात उभे राहणार पायाभूत काजू सुविधा केंद्रमहाराष्ट्र काजू परिषदेचे तज्ञ संचालक मनीष दळवी यांची माहिती…
