*💫सावंतवाडी दि.२८-:* राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष तसेच ज्येष्ठ व्यापारी तथा सावंतवाडीचे माजी नगरसेवक चंद्रकांत बाबणी उर्फ अण्णा शिरोडकर (८९) यांचे शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यावर सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ तसेच सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज संघटना स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. सावंतवाडी वैश्य समाज समितीचे ते विद्यमान सचिव होते. त्यांच्या मागे तीन मुलगे सुनील, प्रसन्ना उर्फ नंदू, प्रशांत तसेच पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी नगराध्यक्षा श्वेता शिरोडकर यांचे ते सासरे होत.
सावंतवाडी येथील माजी नगरसेवक चंद्रकांत शिरोडकर यांचे निधन…
