सिटी स्कैन एचआरसिटीसाठी खाजगी सेवेकडून लूट

मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यानी वेधले जिल्हाधिकारी यांचे लक्ष

*💫कुडाळ दि.२८-:* खाजगी सिटी स्कॅन सेंटर मध्ये एच आर सी टी टेस्टचा अवाजवी दर आणि जनतेची होणारी लूट या विषयावर आज मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांची भेट घेऊन तक्रार केली आहे. यावेळी शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दर खाजगी सिटी स्कॅन सेंटर मालक आकारत असून, जनतेची लूट करत आहेत. यावर तातडीने येत्या चार दिवसात कारवाई करून, शासनाच्या निर्णयांची अंमलबजावणी करावी. अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने केली आहे. यावेळी ज्या रुग्णांकडून यापूर्वी जास्त पैसे आकारण्यात आले आहेत. ते पैसे त्यांना पुन्हा परत करण्यात यावेत. अशी मागणी केली आहे. या सर्वांवर पुढील ४ दिवसात योग्य तो बंदोबस्त न झाल्यास मनसे आपल्या पद्धतीत यांचा बंदोबस्त करेल असा इशारा दिला आहे. यावेळी सिंधुदुर्ग वसियानी एच आर सी टी सिटी स्कॅन ला जातेवेळी कोव्हिड संदर्भातील रिपोर्ट सोबत ठेवावा. टेस्ट झाल्यानंतर रीतसर बिल घ्यावे, एच आर सी टी चा प्रिंट रिपोर्ट घ्यावा, व तक्रार असल्यास जिल्हाधिकारी यांच्या नावे बिलासह तक्रार करावी किंवा मनसे पदाधिकारी किंवा ९८२३३९३९७७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मनसेच्या शिष्टमंडळाने केले आहे. यावेळी मालवण माजी तालुकाध्यक्ष गणेश वाइरकर, उप तालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, कुडाळ तालुका सचिव रमा नाईक, प्रथमेश धुरी, उपविभाग अध्यक्ष विष्णू मस्के आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page