वेंगुर्ला महिला पोलीस नंदिनी गावकर यांची कार्यतत्परता…

⚡वेंगुर्ला ता.२६-: वेंगुर्ला तालुक्यातील
शिरोडा केरवाडी येथे दोन दिवसापूर्वी पहाटे झालेल्या वादळी वाऱ्यात बोट उलटून शिरोडा येथील मच्छिमार राजन राघोबा सारंग (वय 48) हे बेपत्ता झाले होते.तर दोन मच्छीमाराना वाचविण्यात सहकाऱ्यांना यश आले होते. दरम्यान बेपत्ता यांचा मृतदेह मंगळवारी पहाटेच
वायंगणी किनाऱ्यावर असल्याची माहिती मिळताच
वेंगुर्ला पोलीस स्थानकातील
महिला पोलीस नंदिनी गावकर, पो. कॉ.
अरुण गुंजाळ, पो. कॉ.
सागर चौगुले, ग्रामस्थ अमोल मसुरकर यांनी अगदी सकाळीच वायंगणी येथे दाखल होत पुन्हा वाहून जात असलेला मृतदेह त्वरित बाहेर काढला.यासाठी कासवमित्र सुहास तोरसकर यांनीही सहकार्य केले. वेंगुर्ला पोलीस स्थानकात पहाटे 5.15 वाजता याबाबतची माहिती मिळताच महिला पोलीस नंदिनी गावकर यांनी व अन्य पोलिसांनी दाखविलेल्या कार्यतत्परतेबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page