⚡सावंतवाडी ता.२६-: मळेवाड ते सावंतवाडी मुख्य रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने वरची मळेवाड मसुरकरवाडी येथे मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास भली मोठी काजूच्या झाडाची फांदी तुटून रस्त्यावर पडली होती.यात विद्युत पुरवठा करणारा पोल ही कोसळला होता.यामुळे या रस्त्यावरील वाहतूक काही काळ दोन्ही बाजूने अडकली होती.मात्र तात्पुरत्या स्वरूपात येथील स्थानिक ग्रामस्थांनी ही भली मोठी फांदी बाजूला करून वाहतूक सुरळीत केली होती.यावेळी वाहनचालक एवढी घटना घडूनही न थांबता पसार झाला होता.
मात्र सदरील भली मोठी फांदी सायंकाळ पर्यंत रस्त्यावरच असल्याने एखादा अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.यातच अज्ञात वाहनाच्या धडकेने पडलेल्या फांदीचा अंदाज न आल्यामुळे या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी कामावर जाणार युवक थोडक्यात बचावला होता.मात्र त्याच्या दुचाकीचे दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
दिवसभर या रस्त्यावरील बांधकाम विभागाचे कर्मचारी या घडलेल्या घटनेची दखल घेतील अशी अपेक्षा होती.मात्र सदरील विभागाने दखल न घेतल्यामुळे सामाजिक बांधिलकी तसेच या घटनेमुळे कोणा दुसऱ्यांना नुकसान पोहचू नये या हेतूने पेंडूर घोडेमुख येथील युवकांनी पुढाकार घेत या रस्त्यावरील पडलेल्या भल्या मोठ्या फांदीला कटर च्या सहाय्याने कट करून बाजूला करून रस्ता वाहतुकीस सुरळीत केला.
प्रशांत शिरोडकर, संदेश मोरजकर, स्वप्नील नेमन, राहुल प्रभू आणि सुधीर परब यांनी या कामी मदत केली.
या युवकांच्या सतर्कतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
पेंडूर घोडेमुख येथील युवकांच माणुसकीचे दर्शन…
