⚡वेंगुर्ला ता.२५-: वेंगुर्ला तालुक्यात रविवारी 24 मे रोजी पहाटे अचानक आलेल्या वादळीवाऱ्याने शिरोडा केरवाडी येथून समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली मच्छिमारी बोट खोल समुद्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. यात शिरोडा केरवाडी येथील मच्छिमार राजन राघोबा सारंग (वय 48) हे बेपत्ता झाले होते. तर अन्य दोन मच्छीमाराना वाचविण्यात सहकाऱ्यांना यश आले होते. सोमवारी दुसऱ्या दिवशी सायंकाळी उशिरापर्यंत प्रशासनामार्फत शोधमोहीम राबविण्यात आली. परंतु संबंधित व्यक्तीचा अद्याप शोध लागला नाही. सोमवारी सायंकाळी वेंगुर्ला येथील मच्छिमार नेते तथा भाजपा पदाधिकारी वसंत तांडेल यांनी शिरोडा येथे मच्छिमार बांधवांची भेट घेतली.
शिरोडा येथीलमच्छिमार दुसऱ्या दिवशीही बेपत्ता…
