शिरोडा येथीलमच्छिमाराचा मृतदेहवायंगणी पोयंडीवाडी किनाऱ्यावर आढलला…

⚡वेंगुर्ला ता.२६-: वेंगुर्ला तालुक्यात रविवारी 24 मे रोजी पहाटे अचानक आलेल्या वादळीवाऱ्याने शिरोडा केरवाडी येथून समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली मच्छिमारी बोट खोल समुद्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. यात शिरोडा केरवाडी येथील मच्छिमार राजन राघोबा सारंग (वय 48) हे बेपत्ता झाले होते. तर अन्य दोन मच्छीमाराना वाचविण्यात सहकाऱ्यांना यश आले होते. सोमवारी दुसऱ्या दिवशी सायंकाळी उशिरापर्यंत प्रशासनामार्फत शोधमोहीम राबविण्यात आली होती. संबंधित
व्यक्तीचा मृतदेह आज मंगळवारी सकाळी
वायंगणी पोयंडीवाडी किनाऱ्यावर आढळून आला आहे. याबाबत माहिती मिळताच वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी व पोलीस घाटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरु आहे.

You cannot copy content of this page