भाजपा पदाधिकारी अजित नाईक यांची कार्यतत्परता कायम…
⚡वेंगुर्ला ता.२५-:
वेंगुर्ला तालुक्यातील मठ ग्रामपंचायत मुख्य रस्तानजिक साईडपट्टीचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अनियमित होणारे कामाबाबत
भाजपचे पदाधिकारी अजित नाईक यांनी त्वरित दखल घेत “चांगले” काम करण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायत मुख्य कमानीचे सुबक रंगकाम करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांतून व वाहनधारकांतून अजित नाईक यांच्या कार्यतत्परतेबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
सध्या सुरु असलेल्या रस्ता साईडपट्टी भरावाचे कामाकडे अजित नाईक यांनी त्वरित लक्ष पूरविल्याने चांगल्या पद्धतीने काम करण्यात येत आहे. तसेच उर्वरित कामासाठी आणखी मटेरियल टाकण्यात आले आहे. दरम्यान मठ कार्यक्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी नुकतीच विकासकामे जलदगतीने मार्गी लावली आहेत.त्यासाठी भाजपा तालुकाध्यक्ष पप्पू परब व अजित नाईक यांनी सतत पाठपुरावा केला आहे. दरम्यान सरपंचा सौ. रुपाली नाईक यांनी मुख्य रस्ता असल्याने दुसऱ्या बाजूच्या साईडपट्टीचे
काम करण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी केली आहे. त्यानुसार त्याबाबताही अजित नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांची भेट घेऊन सदर काम पावसाळ्यापूर्वी करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. दरम्यान मठ गावातील बरीच विकासकामे भाजपच्या माध्यमातून मार्गी लागल्याने जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.
