⚡वैभववाडी ता.२५-: अल निनोच्या पार्श्वभूमीवर नावळे ग्रामपंचायतने आयोजित केलेल्या ग्रामसभेमध्ये शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये पावसाची अनिमित्त शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी आवश्यक ती काळजी घ्यावी याची माहिती वैभववाडी तालुका उपकृषी अधिकारी श्रीमती व्ही एस तिरवडे यांनी माहिती दिली.
यावेळी सरपंच सोनल गुरव ग्रामपंचायत सदस्य तथा तंटामुक्ती अध्यक्ष संजय शेळके पोलीस पाटील स्नेह शेळके माजी सरपंच संभाजी रावराणे ग्रामपंचायत अधिकारी संभाजी वाघमोडे लक्ष्मण गुरव तानाजी गुरव आदी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित ग्रामसभेत ग्रामस्थांना सन 2026 च्या खरीप हंगामामध्ये पावसाची अनिमित्त आणि शेतकऱ्यांनी पेरणीसाठी आवश्यक ती काळजी घ्यावी यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आली पावसाची परिस्थिती बघून 165 मीटर पर्यंत पाऊस होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करूनही पेरणी करताना शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी मातीचे परीक्षण करून त्यानुसार जमिनीत नत्र स्फुरद पालाशयाच्या मात्रा द्याव्यात पेरणी करताना कमी कालावधीत येणाऱ्या भाताच्या जातींची पेरणी करावी अधि विषयांवर शेतकऱ्यांना श्रीमती व्ही एस तिरवडे यांनी माहिती दिली या सभेला ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अल निनोच्या पार्श्वभूमीवर नावळे ग्रामसभेत शेतकऱ्यांना खरीप हंगामाबाबत मार्गदर्शन…
