संतोष नानचे: पोलीस ठाण्यात निवेदन केले सादर..
⚡दोडामार्ग ता.२५-: राज्यासह देशातील विविध भागांत वाढत असलेल्या बांगलादेशी घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात निवेदन देत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्गमध्ये बाहेरील व्यक्तींची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असल्याने बांगलादेशी घुसखोरांचा शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय व संशयित व्यक्तींची तपासणी करून बांधकाम, फेरीवाले व इतर क्षेत्रांत काम करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिल्ह्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने आवश्यक ती पावले उचलावीत, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी दोडामार्ग व्यापारी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
