करुळ घाटात स्कूटी दरीत कोसळली

जीव रक्षक दल व पोलिसांनी काढले बाहेर;चालक जखमी असून वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात केले दाखल

वैभववाडी-:करुळघाट मार्गात स्‍कुटी चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात चालक दरीत कोसळला.या अपघातात स्कुटी चालक गंभीर जखमी झाला.सह्याद्री जीव रक्षक दल, करूळच्या टीम व पोलिसांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले.दरम्यान जखमी स्कुटी चालकाला ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे उपचारासाठी हलविण्यात आले.ही घटना 27 मे रोजी घडली. या घटनेची माहिती मिळताच वैभववाडी तहसिलदार रामदास झळके,पोलीस निरीक्षक अतुल जाधव व त्यांचे सहकारी कर्मचारी तात्‍काळ घटनास्‍थळी हजर झाले.काही वेळातच सह्याद्री जीवरक्षक दल करुळ व पोलिसांनी दोरीच्या साहाय्याने दरीत उतरून गंभीर जखमी चालकाला दरीच्‍या बाहेर काढणेत आले. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सयाजी धर्मे यांनी जखमी चालकाला दुखापत झाल्याचे निदर्शनास आले.त्यानंतर ग्रामीण रुग्‍णालय वैभववाडी येथील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून दाखल करण्यात आले.या वेळी मंडळ अधिकारी पावसकर,पोलीस कॉन्स्टेबल मारुती साखरे,गणेश भोवड,सावंत,महिला पोलीस अडुळकर,मयेकर,सह्याद्री सुरक्षा दलाचे हेमंत पाटील व करूळ गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page