दोडामार्गमधील उपकेंद्रात कोरोना लसिकरण कार्यक्रम

आरोग्य सभापती डॉ अनिशा दळवींचे प्रयत्न

*💫दोडामार्ग दि.२८ सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात प्राथमिक आरोग्य उपकेंद्रस्तरावर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे.त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परीषद शिक्षण व आरोग्य समिती सभापती डॉ.अनिषा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तेरवण मेढे,घोडगे वायगंणतड,झोळंबे,मणेरी ग्रामपंचायत,तालुका आरोग्य विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी,तळकट,मोरगांव कर्मचारी व इतर ग्रामस्थ यांच्या सहकार्याने अनुक्रमे तेरवण मेढे ग्रामपंचायत कार्यालय,घोडगे वायगंणतड प्राथमिक शाळा,झोळंबे व मणेरी आरोग्य उपकेंद्र येथे उपकेंद्रस्तरावरील लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

येणाऱ्या काळत ४५ वर्षावरील व्यक्तीना जास्त प्रवास करावा लागू नये.प्राथमिक आरोग्य केंद्र वरील लसीकरणासाठी असलेली गर्दी कमी करणे.गाव पातळीवरच लोकांना लसीकरण उपलब्ध करून देणे याकरिता तेरवण मेढे ग्रामपंचायत कार्यालय,घोडगे वायगंणतड प्राथमिक शाळा,झोळंबे व मणेरी आरोग्य उपकेंद्र येथे उपकेंद्रस्तरावरील लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आल्याचे  डॉ.अनिषा दळवी यांनी सांगितले.कोनाळ जिल्हा परीषद मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते,होतकरू तरुण व साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत कर्मचारी यांच्या सहकार्यातून कोनाळ जिल्हा परीषद मतदारसंघात मान्सुनपुर्वी जास्तीत जास्त लसीकरण करुन देण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला.        यावेळी दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी,तळकट व मोरगांव प्राथमिक आरोग्य अंतर्गत गावात एकूण ९००  नागरीकांच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले.वरील सर्व गावात लसीकरणाचे महत्त्वाचे काम मार्गी लावणाऱ्या सर्व आरोग्य,तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांचे डॉ.अनिषा दळवी,भाजपा तालुकाअध्यक्ष प्रविण गवस यांनी अभिनंदन केले आहे.
   वरील सर्व गावातील अधिकाधिक ग्रामस्थांना लसीकरणाचा लाभ मिळावा यासाठी भाजपा तालुका सरचिटणीस सचिन गवस,मणेरी सरपंच श्री.विशांत तळावडेकर,घोटगे सरपंच श्री.संदीप नाईक,तेरवण मेढे सरपंच सौ.सोनाली नाईक,मा.सरपंच सौ.प्रियांका सोनावलकर,झोळंबे उपसरपंच सौ.मानसी गवस,तेरवण मेढे ग्रा.पं.सदस्य श्री.मायकेल लोबो,नमिता गवस,हेवाळे ग्रा.पं.सदस्य समिर देसाई,दिपक शेटये,लवू नाईक,प्रकाश गवस,सिद्धेश पांगम आदीनी प्रयत्न केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी साटेली भेडशी वैद्यकीय अधिकारी श्री.बी.डी.राणे,तळकटचे वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार चिपळूणकर, कार्यक्रम ठिकाणी उपस्थित सर्व आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका व इतर यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page