⚡वेंगुर्ला ता.२४-: वेंगुर्ला तालुक्यात रविवारी 24 मे रोजी पहाटे 4 वा.च्या सुमारास अचानक आलेल्या वादळीवाऱ्याने शिरोडा – केरवाडी येथून समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली मच्छिमारी बोट खोल समुद्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. यात शिरोडा केरवाडी येथील राजन राघोबा सारंग (48) हे बेपत्ता झाले आहेत.प्रशासनामार्फत त्यांचा शोध सुरु आहे. तर होडीमालक प्रकाश राघोबा सारंग (60)व त्यांचा मुलगा राघोबा (दाजी) प्रकाश सारंग (21)यांना वाचवण्यात सहकाऱ्यांना यश आले आहे.
दरम्यान केवळ दैव बलवत्तर म्हणून पिता पुत्र बचावले असा सूर नागरिकांतून व्यक्त होत आहे. यावेळी तातडीने अनिल मसुरकर व अन्य सहकाऱ्याद्वारे दाखवलेल्या प्रसंगावधनानेही दोघांना वाचविण्यात यश आले आहे.
शिरोडा येथे “केवळ दैव बलवत्तर अन पिता पुत्र बचावले”….
