⚡वेंगुर्ला ता.२४-: संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसिद्धीस पावलेल्या सिंधुदुर्गतील वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावचे ग्रामदैवत असलेल्या नराचा नारायण म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव जैतीर या जागृत देवस्थानचा “कवळास उत्सव ” सोमवारी 25 मे रोजी संपन्न होणार आहे. 16 मे रोजी ऐतिहासिक जैतीर उत्सवापासून या प्रसिद्ध धार्मिक उत्सवाची सुरुवात झाली असून सोमवारी सायंकाळी या ऐतिहासिक उत्सवाची ‘कवळास’ उत्सवाने सांगता होणार आहे.सोमवारी सकाळी पहाटेपासून मांडावर प्रमुख धार्मिक कार्यक्रम सुरु राहणार असून सायंकाळी “कवळास “उत्सवाने या वार्षिक महाउत्सवाची सांगता होणार आहे. यावेळी पुन्हा एकदा भाविकांचा जनसागर लोटणार असून भाविकांनी धार्मिक कार्यक्रमांस उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन मानकरी, तुळस श्री देव जैतीर देवस्थान उपसमिती व ग्रामस्थ यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
तुळसचा ऐतिहासिक श्री देव जैतीर “कवळास उत्सव ” उद्या…
