तौक्ते वादळानंतर जिल्ह्याचे गतिमान प्रशासन अद्याप पोचलेले नाही;रहिवाशांची तीव्र नाराजी
*💫मालवण दि.२८-:* तौक्ते चक्रीवादळाची दाहकता अनुभवणाऱ्या सिंधुदुर्गवासीयांना प्रशासनाच्या पातळीवर आवश्यक ते प्रयत्न एकीकडे केले जात असतानाच शिवप्रभूंची शिवलंका म्हणून नावाजल्या गेलेल्या मालवणच्या सागरातील किल्ले सिंधुदुर्ग वर तोक्ते चक्रीवादळा मुळे झालेली घरांची, वीज खांबांची झालेली पडझड, मोडून पडलेली झाडे आणि गेले अकरा दिवस विजे अभावी जीवन जगणाऱ्या किल्ले सिंधुदुर्गवासीयांपर्यंत आजही सिंधुदुर्गचे गतिमान प्रशासन अकरा दिवस उलटूनही पोहोचलेले नाही.या चक्रीवादळात किल्ले सिंधुदुर्ग वरील शिवराजेश्वर मंदिराच्या मागील भागावर वडाचे झाड पडून नुकसान झाले आहे तर किल्ल्यातील भवानी आणि महापुरुष मंदिरावरील छप्पर उडून गेले आहे, वीज खाबांची पडझड झाल्याने किल्ले सिंधुदुर्ग अंधारात आहे याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधुनही किल्ले सिंधुदुर्गबाबत ढिम्म राहण्याची भूमिका प्रशासनाने घेतल्याने निसर्गाने झोडपल आणि शासनाने लाथाडल तर दाद कुणाकडे मागायची असा सवाल आता किल्लावासीयांना पडला आहे. यासंबंधीचे अधिक वृत्त असे की, हवामान विभागाने सिंधुदुर्गसह कोकण किनारपट्टीला तौक्ते चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा दिल्यानंतर या इशाऱ्या प्रमाणे तौक्ते चक्रीवादळाने सिंधुदुर्गच्या किनारपट्टीला विशेषतः मालवण तालुक्याला जोरदार दणका दिला. हा दणका एवढा तीव्र होता की वादळ शमल्यानंतर नुकसानीचा आकडा काही कोटींच्या घरात पोहोचला आहे. यात घरांची पडझड, मोडून पडलेली झाडे, शासकीय इमारती व वीज वितरणचे झालेले नुकसान यांचा समावेश आहे. तौक्ते चक्रीवादळनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहित सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, भाजपचे प्रदेश सरचिटणीस निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, माजी आमदार परशुराम उपरकर, मनसे नेते तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मालवण तालुक्याची पाहणी केली. ही पाहणी करीत असताना प्रशासनाला सत्तारूढ पक्षाच्या मंत्र्यांनी आमदार खासदारांनी आदेश दिले तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सूचना केल्या. हे सर्व खरे असले तरी मालवण शहराला तौक्ते चक्री वादळाची तीव्रता ज्याच्यामुळे कमी झाली, चक्री वादळामुळे निर्माण झालेल्या अजस्त्र लाटांचे फटकारे ज्यांनेे आपल्या अंगावर झेलून साडे तीनशे वर्षानंतरही छत्रपतींच्या नावापोटी रयतेचे म्हणजेच मालवण वासीयांचे संरक्षण केले त्या किल्ले सिंधुदुर्गकडे मात्र राजकीय पक्षाच्या नेते मंडळींनी दुर्लक्ष तर केलेच पण प्रशासनही किल्ले सिंधुदुर्गकडे फिरकले नसल्याचे उघड झाले आहे. १६ मे रोजी झालेल्या चक्रीवादळात किल्ले सिंधुदुर्गमध्ये राहणाऱ्या लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या चक्रीवादळाने किल्ले सिंधुदुर्ग मधील सादिक शेख यांचे घराचे छप्पर उडून गेले आहे तर नरेश नारायण सावंत यांच्या घराच्या छपराचे पत्रे उडून गेले आहेत. या व्यतिरिक्त श्रीकृष्ण भगवान फाटक आणि मधुसूदन मोरेश्वर फाटक यांच्या घरांच्या छपराची कौलेही उडून गेल्याने या लोकांच्या डोक्यावर आभाळाने छत पांघरले आहे. शिवराजेश्वर मंदिरावर झाड पडले. मालवणच्या किल्ले सिंधुदुर्गवर छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर असून हे मंदिर त्यांचे पुत्र राजाराम महाराजांनी हे मंदिर बांधले आहे. या मंदिराच्या मागील बाजूस जी छपराची नव्याने डागडुजी करण्यात आली त्याच भागावर झाड पडल्याने मंदिराचे अंशतः नुकसान झाले आहे. तर किल्ले सिंधुदुर्ग वरील श्री देवी भवानी मंदिर आणि महापुरुष मंदिराच्या छपराची कौलेही उडून गेली आहेत. अकरा दिवसानंतरही किल्ले सिंधुदुर्ग अंधारात. तौक्ते चक्रीवादळाचा फटका एवढा तीव्र होता की, किल्ले सिंधुदुर्ग वरील वीज खांब या वादळाने जमीनदोस्त केले. गेले अकरा दिवस किल्ले सिंधुदुर्ग वासीय काळोखात राहत आहेत. रॉकेलच्या दिव्याच्या मिणमिणत्या प्रकाशात गेले अकरा दिवस राहणाऱ्या किल्ले सिंधुदुर्ग वासीयांकडे कुणाचेही लक्ष नाही. एवढेच नव्हे तर या चक्रीवादळामुळे किल्ल्यामधील रहिवाशांच्या तीन होड्याही समुद्रात वाहून गेल्या आहेत घरांची नुकसानी झाली आहे. प्रशासनाला माहीत असूनही प्रशासनाने याकडे कानाडोळा केल्याचा आरोप किल्ले सिंधुदुर्ग वरील रहिवाशी मंगेश सावंत यांनी केला आहे. चाळीस वर्षापूर्वीचे जीवन अनुभवतो तौक्ते चक्रीवादळामुळे किल्ले सिंधुदुर्ग वासीय नुकसानग्रस्त बनले आहे. चक्रीवादळाने वीज पुरवठा खंडित केलाच परंतु प्रशासनाने किल्ला रहिवाशांकडे दुर्लक्ष केल्याने सध्यातरी त्यांच्या डोळ्यासमोर अंधारच अंधार दिसत आहे. या संदर्भात बोलताना किल्ला रहिवाशी श्री. मंगेश सावंत म्हणाले सध्या आम्ही चाळीस वर्षापुर्वीचे जीवन जगत आहोत. १९७८ पर्यंत किल्ले सिंध
