तौक्ते ग्रस्तासाठी भरघोस मदत केल्याने मानले आभार
*💫कणकवली दि.२७-:* महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोकणच्या फायद्यासाठी घेतलेल्या निर्णयामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा नगरसेवक आबिद नाईक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवरील जिल्ह्यात बहुउद्देशीय निवारा शेड, भूमिगत विज वाहिन्या, धूप प्रतिबंधक बांधाऱ्यासह लाईट नींग अरेस्टर उभारण्याचे तात्काळ निर्णय घेण्यात आल्याने भविष्यात अशा प्रकारचे चक्रीवादळ आल्यास त्याचा फायदा कोकणातील नागरिकांना होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
