सरपंच उर्मिला देसाई यांनी केल धाडसी ऊपक्रमाचे कौतुक_
*💫दोडामार्ग दि.२७-:* दोडामार्ग तालुक्यातील कोलझर गावात ठिकठिकाणी संजू विर्नोडकर टीमच्यावतीने निर्जंतुकीकरण करण्यात आले. या धाडसी ऊपक्रमाचे सरपंच उर्मिला देसाई यांनी कौतुक केल. अखेर कोलझर गावात कोरोनाचा शिरकाव झाला. कोलझर ग्रामसेवक नामदेव अर्जुन परब यानी सावंतवाडी येथे संजू विर्नोडकर याच्याशी संपर्क करून गावातील भितीदायक परिस्थिचीचे वातावरण व कोरोनाचा प्रार्दुभाव गावात पसरू नये याची जाणीव करून दिली. मालवण सुकलवाड येथील निर्जंतुकीकरणाचे काम आटपून संजू विर्नोडकर टीम कोलझर येथे दाखल झाली. येथील टेमवाडी येथे कोरोनाबाधित रूग्ण सर्वात जास्त सापडल्यामुले या संपुर्ण वाडीवरील सर्व घरोघरी व बाधितांच्या प्रत्यक्ष घरात, रुग्णांच्या खोलीत, स्वच्छतागृहात, रस्त्यावर जंतुनाशक फवारणी करून निर्जंतुकीकरण करुन संजू विर्नोडकर टिंमने धाडसी ऊपक्रम राबवला. त्याचप्रमाणे या गावात असलेल्या मधलीवाडी, क्रिच्छवाडी याही ठिकाणी रेडझोन घरांमध्ये, बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणी, आरोग्य उपकेंद्र अशा वर्दळीच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण केले. या गावचे कार्यकर्ते आप्पा देसाई यानीही स्वतः सहभाग घेवून या फवारणीमुळे गावातील नागरिक समाधानी झाले असल्याचे सांगितले. ग्रामसेवक नामदेव परब, लिपीक कृष्णा देसाई, कर्मचारी सखाराम राणे, आरोग्य सेविका सुप्रिया तेडोलकर, आप्पा देसाई व संजू विर्नोडकर टिमचे संतोष तळवणेकर, आकाश मराठे, सागर मळगावकर, तुषार बांदेकर ऊपस्थित होते.
