शहरासह ग्रामीण भागात उद्या लसीकरण मोहीम;वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी दिली माहिती_
*💫मालवण दि.२७-:* मालवण तालुक्यात ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोविशील्ड लसचे १७५० डोस उपलब्ध झाले असून मालवण शहरासह ग्रामीण भागात विविध आरोग्य केंद्रांवर उद्या २८ मे रोजी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. ४५ वर्षावरील नागरिकांना पहिला डोस तसेच पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना दुसऱ्या डोससाठीच ही लस देण्यात येणार आहे, अशी माहिती मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी दिली यात मालवण ग्रामीण रुग्णालयाला १५० डोस प्राप्त झाले असून ४५ वर्ष वरील ज्या नागरिकांना ग्रामीण रुग्णालयातुन संपर्क साधून कुपन क्रमांक दिला असेल त्यांनीच उद्या २८ मे रोजी मामा वरेरकर नाट्यगृह येथे सकाळी ९ वाजता उपस्थित राहून लस घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी केले आहे. तालुक्यात गोळवण व पेंडूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी १०० डोस उपलब्ध झाले आहेत. तर बांदिवडे -१००, त्रिंबक १००, चिंदर १००, बिळवस १५०, मालोंड १५०, देवली २००, तारकर्ली १००, वराड १००, पेंडूर १००, रामगड २००, मसदे १०० या उपकेंद्रावर डोस प्राप्त झाले आहेत, या केंद्रावर उद्या २८ मे रोजी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
